महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ : मराठी भाषा व संस्कृतिसंवर्धक एक शासकीय संस्था. मराठी भाषा व साहित्य यांचा सर्वांगीण विकास करुन साहित्याबरोबरच इतिहास व कला या क्षेत्रांतील महाराष्ट्राचा थोर वारसा जतन करणे, हा या मंडळाचा उद्देश आहे. याची स्थापना महाराष्ट्र राज्य शासनाने १९ नोव्हेंबर १९६० रोजी केली.